भुवनेश्वर -ओडिशातचार रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या नव्या कोरोनाबाधितांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता 48 वर पोहचला आहे.
#coronavirus : ओडिशात कोरानाचे 4 नवे रुग्ण ; एकूण आकडा 48 वर - ओडीशा लॉकडाऊन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असतानाच ओडिशा सरकारने मात्र लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
![#coronavirus : ओडिशात कोरानाचे 4 नवे रुग्ण ; एकूण आकडा 48 वर](https://etvbharatimages.akamaized.net/assets/images/breaking-news-placeholder.png)
हेही वाचा...जगभरात कोरोनाचे रुग्ण 15 लाखांच्या पुढे; 91 हजार दगावले
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, ओडिशा सरकारने राज्यातील परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.