सोनीपत(हरियाणा) -हरियाणातील गायक सुमित गोस्वामी यांच्या दातौली गावातील घराजवळ काही अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला आहे. यावेळी त्यांनी सुमित व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी आपल्या चारचाकीतून पळ काढला. याबाबत सुमित गोस्वामी यांच्या दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही : हरियाणातील गायक सुमित गोस्वामींच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार - singer sumit goswami latest news
हरियाणातील गायक सुमित गोस्वामी यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला आहे. त्यांनी सुमित गोस्वामी यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत जीटी रोड पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी जितेंद्र कुमार म्हणाले, त्यांच्याकडे गायक सुमित गोस्वामी यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा क्रमांक मिळवला व त्या व्यक्तींचा तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा -उत्तर प्रदेशातील दोन बड्या काँग्रेस नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी, प्रियंका गांधींवर डागली तोफ