महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार.. - J&K encounter

सीमा सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यामध्ये काही दहशतवादी लपून होते. या दहशतवाद्यांनी तेथून पळून जाताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांना संपवण्यात आले आहे.

Four militants killed
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार..

By

Published : Mar 15, 2020, 12:47 PM IST

Updated : Mar 15, 2020, 1:50 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार..

सीमा सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यामध्ये काही दहशतवादी लपून होते. या दहशतवाद्यांनी तेथून पळून जाताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांना संपवण्यात आले आहे.

या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :पाकिस्तानात २५ दहशतवादी संघटना सक्रिय; भारताने सुनावले खडे बोल

Last Updated : Mar 15, 2020, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details