फतेहाबाद- जिल्ह्यातील दायोर गावात संशयीतरित्या गायींची तस्करी केल्याच्या आरोपाखाली ४ जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी गोरक्षेच्या नावाखाली कहर म्हणून चौघांना जबरदस्तीने मूत्र पाजण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली.
हरियाणात गोरक्षेच्या नावाखाली चौघांना दिली 'ही' घृणास्पद शिक्षा, काठ्यांनी केली बेदम मारहाण - विल्हेवाट
त्यांनी आमचे कपडे काढले आणि काठ्यांनी मारहाण केली. त्यांनी आम्हांला मुत्र पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळपास ३० जणांनी आम्हांला मारहाण केली, असे मारहाण केलेल्या व्यक्तीने सांगितले.
पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले, की आम्हाला याबाबत फोनवरुन माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळावर गेल्यावर गाय आणि तिचे वासरु आम्हाला मृतावस्थेत आढळून आले. यावरुन दायोर गावाचे नागरिक त्या चौघांना मारहाण करत होते. यावेळी त्या चौघांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची चौकशी सुरू आहे.
परंतु, या घटनेबद्दल बोलताना मारहाण झालेल्यापैंकी एकजण म्हणाला, आम्ही मृत झालेली जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम करतो. परंतु, संशयाखाली आम्हांला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी आमचे कपडे काढले आणि काठ्यांनी मारहाण केली. त्यांनी आम्हांला मुत्र पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळपास ३० जणांनी आम्हांला मारहाण केली. आम्ही कोणत्याही गायीला मारलेले नाही. आमचे काम मृत गायींची विल्हेवाट लावणे आहे.