भोपाळ-मध्यप्रदेशातील शाहजापूरजिल्ह्यातील बिजनाखेडी गावात शेतातील विहिरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर अचानक माती ढासळली. या घटनेत चार मजूर 12 तास मातीखाली दबून होते. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मध्य प्रदेश: शाहजापुरात विहिरीत काम करणाऱ्या 4 मजुरांचा मृत्यू - मजुरांचा मृत्यू मध्य प्रदेश बातमी
स्थानिक ग्रामस्थांनी सर्वप्रथम मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण विहिरीच्या खोलीमुळे ते काढू शकले नाहीत. त्यानंतर घटनेची माहिती शाहजापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

शाहजापुरात विहिरीत काम करणाऱ्या 4 मजुरांचा मृत्यू...
विहिरीत काम करणाऱ्या 4 मजुरांचा मृत्यू...
स्थानिक ग्रामस्थांनी सर्वप्रथम मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण विहिरीच्या खोलीमुळे ते काढू शकले नाहीत. त्यानंतर घटनेची माहिती शाहाजापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. जिल्हा बचाव पथकाने विहिरीजवळ जेसीबी मशीनच्या सहाय्याने एक समांतर खड्डा खोदुन या मजुरांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या मजुरांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दिनेश जैन व एसपी पंकज श्रीवास्तव घटनास्थळी दाखल झाले होते.
Last Updated : Jun 10, 2020, 2:26 PM IST