ग्वाल्हेर(मध्य प्रदेश) - ग्वाल्हेर शहराच्या मध्यभागी असलेल्या तीन मजली इमारतीमधील दोन पेंट दुकानांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मिळत आहे.
ग्वाल्हेरमधील दोन पेंट दुकानांना भीषण आग, चौघांचा मृत्यू - ग्वाल्हेर दुकानांना आग
आग लागल्यानंतर लगेच अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले.
ग्वाल्हेरमधील दोन पेंट दुकानांना भीषण आग, चौघांचा मृत्यू
आग लागल्यानंतर लगेच अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
यात जखमी झालेल्या नागरिकांना JAH रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस व पालिका कर्मचारी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मिळत आहे.