मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एका महिलेसह 4 जण जखमी झाले. दारूच्या नशेत नाचणाऱ्यांमध्ये वादावादी होऊन हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात घडली. मन्सूरपूर पोलीस ठाणे अधिकारी (एसएचओ) कुशलपाल सिंह यांच्या मते, दारूच्या नशेत असलेल्या हरदीप आणि सुरेंदर 'घुडचडी' विधीदरम्यान नाचण्यावरून भांडण सुरू झाले. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यानंतर येथे दोन गट तयार होऊन त्यात अनेक लोक सामील झाले.