महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन सैन्य मारहाण प्रकरण: भारतीय सैन्यातील आणखी चार जवान गंभीर

भारत-चीन देशांच्या सीमेवर तैनात दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय लष्करातील एक कर्नल व दोन जवानांना वीरमरण आले. या दरम्यान, भारताकडून करण्यात आलेल्या प्रतिकारामध्ये चीनचेही जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. यात भारतीयसैन्यातील आणखी चार जवान गंभीर जखमी आहेत.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jun 17, 2020, 10:14 AM IST

Updated : Jun 17, 2020, 10:20 AM IST

नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. या मारहाणीत भारतीय सैन्य दलातील आणखी चार जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्य दलातीलही अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. वृतसंस्था एएनआयला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

मागील अनेक दिवसापासून भारत व चीनमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रदेशावरून तणाव होता. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात चर्चाही झाली होती. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले आहे. पण, यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले.

दरम्यान, या घटनेवर अमेरिका करडी नजर ठेवून आहे. त्याचबरोबर शांतीपूर्ण तोडग्याचे आम्ही समर्थन करतो, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हेही वाचा -''हुतात्मा जवानाबद्दलचे दु:ख शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकत नाही"

Last Updated : Jun 17, 2020, 10:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details