महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रशियन स्पुटनिक लस निर्मितीसाठी चार भारतीय कंपन्यांचा प्रस्ताव, फेज-३ ट्रायलही लवकरच

भारत आणि रशियामध्ये लसीवरील चर्चा प्रगतीपथावर आहे. लस निर्मिती, चाचणी आणि नियमिततेसंबंधीच्या प्रश्नांवर काम सुरू आहे. रशियाने तयार केलेल्या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतून सकारात्मक निकाल समोर आल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी सांगितले.

Russian Covid-19 vaccine
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल

By

Published : Sep 8, 2020, 9:02 PM IST

नवी दिल्ली - रशियन बनावटीच्या स्पुटनिक-५ लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतीय स्वयंसेवकांवर घेण्यासाठी विविध पर्यायांवर सरकार विचार करत आहे. तसेच चार भारतीय कंपन्यांनी स्पुटनिक लसीची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज(मंगळवार) सांगितले. पॉल हे लसीसंबंधीत तज्ज्ञ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीच्या लस निर्मितीसाठी आपला मित्र देश रशियाने भारतापुढे प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर रशिया आणि भारत सरकारमध्ये मागील काही आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. चार देशी कंपन्यांनी लस निर्मितीसाठी आधीच सरकारकडे प्रस्ताव ठेवला आहे, असे पॉल यांनी सांगितले.

भारत आणि रशियामध्ये लसीवरील चर्चा प्रगतीपथावर आहे. लस निर्मिती, चाचणी आणि नियमिततेसंबंधीच्या प्रश्नांवर काम सुरू आहे. रशियाने तयार केलेल्या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतून सकारात्मक निकाल समोर आल्याचे पॉल यांनी सांगितले.

देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पॉल यांनी मान्य केले. देशातील आर्थिक कारभाराला सुरूवात केल्यामुळे तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पॉझिटव्ह केस वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, काळजी घेण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. देशातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर झाली नाही, असेही ते म्हणाले.

भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्या तिसऱ्या टप्प्यातील लसीच्या चाचण्या घेत असून सिरम इन्स्टिट्युट कंपनी ऑक्सफर्डच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पुढील आठवड्यापासून सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details