आसाम - एकीकडे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे आसामध्ये ४ ठिकाणी ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे. या स्फोटांमागे कोणाचा हात आहे याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये चार ठिकाणी ग्रेनेड हल्ला
एकीकडे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे आसामध्ये ४ ठिकाणी ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली.
प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये ग्रेनेट हल्ला
दोन स्फोट दिब्रूगढमध्ये, एक सोनारीत आणि एक स्फोट दुलियाजन येथे पोलीस स्टेशनजवळ झाला आहे. सध्यातरी या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. आसाममधील दिब्रूगढमध्ये राष्ट्रीय महामार्ग 37 वर एका दुकानाजवळ स्फोट झाला. ६ दिवसापूर्वीच सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या तयारीदरम्यान, चराईदेव जिल्ह्यात स्फोट झाला होता. त्यावेळी झालेल्या स्फोटात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं होतं.
Last Updated : Jan 26, 2020, 10:31 AM IST