नरसिंहपूर (मध्य प्रदेश)-राज्यातील नरसिंहपूरमधील गाडरवाराजवळील नादानेर गावाजवळ महामार्गावर तेलाच्या कॅनने भरलेला ट्रक पलटी झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशातील नरसिंहपूरजवळ ट्रकचा अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - नरसिंहपूरमध्ये ट्रक पलटी
सोनखेड देवास येथून जबलपूर येथे जाण्यासाठी एका कुटुंबातील 4 जण ट्रकमधून प्रवास करत होते. नरसिंहपूर येथे ट्रक पलटी झाला. त्यामध्ये सर्वांचा मृत्यू झाला.
मध्यप्रदेशात ट्रकचा अपघात 4 ठार
अपघातात मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृत्यू झालेल्या पुरुषाचे नाव वीरेंद्र माहेश्वरी आहे. त्याच्या पत्नीचे नाव पूजा असून त्यांच्या मुलांचाही मृत्यू झाला.
चौघेजण सोनखेड देवास येथील असून ते जबलपूरला जात होते. ट्रकवर गादी टाकून त्यावर ते झोपलेले होते. राखी पौर्णिमेच्या दिवशी या कुटुंबावर काळाने घाला घातला. गाडरवारा आणि सलीचौका पोलीस अपघाताची चौकशी करत असून ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.