नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने नव्याने डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार निर्भया प्रकरणातील चारही दोषींना २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने याप्रकरणी नव्याने डेथ वॉरंट जारी केले आहे. तीन वेळा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे.
20 मार्चला फाशी होईल अशी अपेक्षा - निर्भयाची आई
दिल्ली न्यायालयाने निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपींना नवे डेथ वॉरंट काढले आहे. त्यानुसार येत्या 20 मार्चला या चारही दोषींना फाशी होणार आहे. यावर बोलताना निर्भयाच्या आईने 20 मार्चला नक्की फाशी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दोषींच्या वकिलांनी व्यक्त केली नाराजी
दोषींचे वकील ए. पी सिंग यांनी न्याायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींमध्ये परिवर्तन होत असल्याचे ते म्हणाले. तसेच अक्षयकडे कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.