महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश : कटनी जिल्ह्यात भिंत कोसळून चार मुलांचा मृत्यू - mp wall collapse news

मध्यप्रदेश राज्यात भिंत कोसळून ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. कटनी जिल्ह्यातील उमरियापाना पोलीस ठाणे क्षेत्रातील बनहरा गावात ही घटना घडली. घराची भिंत कोसळल्याने चार मुलांचा करुण अंत झाला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 29, 2020, 5:54 PM IST

Updated : Aug 29, 2020, 7:33 PM IST

भोपाळ- मध्यप्रदेशात अंगावर भिंत कोसळल्याने ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. कटनी जिल्ह्यातील उमरियापाना पोलीस ठाणे क्षेत्रातील बनहरा गावात ही घटना घडली. मुलांच्या मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

भिंत कोसळून चार मुलांचा मृत्यू

चारही मुले रस्त्यावर खेळत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर शेजारील भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच विभागीय तहसीलदार हरिंसिंह धुर्वे आणि इतर अधिकरी घटनास्थळी दाखल झाले. चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरियापान येथे पाठविण्यात आले आहेत.

Last Updated : Aug 29, 2020, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details