लंडन - पाकिस्तानातील मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्टचे (एमक्यूएम) प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात 'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' हे गाणे गायले आहे. याचबरोबर त्यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला पाठींबा दिला.
चक्क एका पाकिस्तानी नेत्याने गायले 'सारे जहाँ से अच्छा' - सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा
पाकिस्तानातील मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्टचे (एमक्यूएम) प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात 'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' हे गाणे गायले आहे.
काश्मीरमधून कलम 370 हटवणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. जर पाकिस्तानकडे शक्ती आहे. तर त्यांनी देखील पाकव्याप्त काश्मीरवर निर्णय घ्यावा. पाकिस्तानी सेना निष्पाप मोहाजीर, बलोच आणि पश्तून नागरिकांची भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप लावून त्यांची हत्या करते. पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना काश्मीरमधील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी पाठवते, असे हुसेन म्हणाले.
अल्ताफ यांना पाकिस्तानाविरोधात भाषण दिल्यामुळे लडंनमधील त्यांच्या घरून अटक करण्यात आली होती. पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्र बिंदू असून तो पुर्ण जगासाठी एक कर्करोग असल्याचे ते म्हणाले होते. अल्ताफ यांच्या पक्षाचा कराचीमध्ये जवळपास 30 वर्षापासून दबदबा आहे.