महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आग्र्यातील मेट्रो कामाचे पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे केले भूमीपूजन - agra letest news

आग्र्यातील मेट्रो कामाचे पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे भूमीपूजन केले. या कार्यक्रमाला पंतप्रधान दिल्लीतून तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्र्यात उपस्थित होते.

modi
मोदी

By

Published : Dec 7, 2020, 1:34 PM IST

आग्रा(उत्तर प्रदेश) - पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीतून आग्रा शहरातील मेट्रो सिटीचे व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे भूमीपूजन केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आगऱ्यातून हजर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय राज्य मंत्री हरदीप पुरी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मेट्रोचे काम फतेहाबाद रोडपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.

जेव्हा तुम्ही धैर्य आणि समर्पणाने पुढे जाता तेव्हा कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. भारतातील सामान्य तरुण, भारतातील छोटी शहरे आजही तेच धैर्य आणि समर्पण दर्शवित आहेत, असे वक्तव्य मोदींनी या कार्यक्रमात केले.

आग्र्यातील मेट्रो कामाचे पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे केले भूमीपूजन

काय म्हणाले पंतप्रधान मोदी -
- २०१४ पासून गेल्या सहा वर्षांत देशात ४५० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. तसेच सुमारे १००० किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहेत.

- आग्र्यात योग्य सुविधा विकसित करण्यासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी ज्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचे भूमीपूजन केले होते, ते सेंटर आता बनून तयार आहे, असे मोदींनी सांगितले.

- पंतप्रधान म्हणाले की आग्र्याची प्राचीन आणि ऐतिहासिक ओळख आधीपासून होती. आता त्यात आधुनिकता जोडली जात आहे. शेकडो वर्षांची इतिहास असलेले हे शहर आता 21 व्या शतकातील विकासात सामील होण्यास सज्ज झाले आहे.

- आग्रामध्ये चांगल्या सुविधा विकसित करण्यासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे.

२०२२ च्या निवडणुकांपूर्वी तयार होणार मेट्रो -

आग्र्यातील मेट्रो २०२२ पर्यंत लोकांना प्रवासासाठी उपलब्ध करवून देण्याचा योगी सरकारचा प्रयत्न आहे. २०२२च्या निवडणुकीपूर्वी आग्र्यात मेट्रो धावायला लागेल. आग्रा मेट्रो कॉरीडोर आयुक्तालयाच्या जमीनीवर बांधण्यात येत आहे. हा कॉरिडोर ९ हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर असेल. दुसरा कॉरीडोर सिकंदरा पासून ताजमहल ईस्ट गेटपर्यंत आहे. या कॉरीडोरमध्ये सुरुवातीला ताजमहलच्या ईस्ट गेटपासून जामा मस्जिदपर्यंतचे ६ किलोमीटरचा मेट्रो ट्रॅक तयार केला जात आहे. यामध्ये सहा मेट्रो स्टेशन आहेत. दुसरा मेट्रो कॉरिडोर आग्रा कँटपासून कालिंदी विहारदरम्यान बनवला जाणार. हा कॉरीडोर १५.४ किलोमीटरचा आहे. यामध्ये १४ स्टेशन आहेत.

हेही वाचा -शरद पवारांचे कृषी सुधारणां बाबतचे 'ते' पत्र व्हायरल; राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details