भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तथाकथित 42 डॉक्टरांच्या 'दुकानां'ना (क्लिनिक) सील करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. तोतया डॉक्टरांविरोधात मोहीम राबवण्यात आली आहे.
अधिकृतपणे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तथाकथित डॉक्टरांविरूद्ध सर्वसमावेशक तपासणी मोहीम राबविली. लोकांवर उपचार करणाऱ्या मात्र, अधिकृत कागदपत्रे नसलेल्या संशयित डॉक्टरांच्या दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेमध्ये असे आढळले आहे की, असे बरेच डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडे डिग्री नाही आणि ते रुग्णांवर अॅलोपॅथी उपचार करत आहेत. यासह काही लोक असे आहेत, ज्यांच्यामार्फत पदवीविनाही दवाखाने चालविले जात होते. एवढेच नव्हे तर, दवाखाने चालवण्याच्या नियमांनुसार, या डॉक्टरांनी आरोग्य विभागाची परवानगीही घेतली नव्हती.