भोपाळ - मला भाजपने पक्षात येण्याची संधी दिली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.
भाजपने संधी दिल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो - सिंधिया - कॉंग्रेस ज्योतिरादित्य सिंधिया
मला भाजपने पक्षात येण्याची संधी दिली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले

प्रदेश भाजप कार्यालयात बोलताना सिंधिया म्हणाले की, 'मी पक्षासाठी मनापासून काम करेन. मी भाजपमध्ये येऊन स्वतःला भाग्यवान समजतो. पक्ष अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आर्शीवाद लाभले. मला त्यांनी पक्षात यायची संधी दिली. याबद्दल त्यांचे धन्यवाद.'
पुढे ते म्हणाले, 'मी ज्या संघटनेत आणि कुटुंबामध्ये २० वर्षे व्यतीत केली आहेत, ज्याच्यांसाठी मी मेहनत आणि प्रयत्न केलेत ते सर्व काही मी मागे सोडत आहे आणि स्वतःला भाजपच्या स्वाधीन करतो आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कुटुंबाने माझ्यासाठी दरवाजे उघडले.' यावेळी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पक्ष कार्यालयात सिंधियाच्या स्वागतासाठी उपस्थित होते.