महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2019, 1:10 PM IST

Updated : Aug 25, 2019, 8:45 AM IST

ETV Bharat / bharat

परदेश दौरा अर्धवट सोडून येऊ नका... जेटली कुटुंबीयांची मोदींना विनंती

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय अर्थमंत्री होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता.

अरुण जेटली

LIVE UPDATES :

२.०० PM -फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झिगलर यांनी जेटली यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखाच्या वेळी फ्रान्स भारत आणि येथील नागरिकांच्या सोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

१.५० PM -अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी एकूण धक्का बसला. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे - नितीन गडकरी

१.३० PM -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेटली यांच्या पत्नी आणि मुलाशी संवाद साधला आणि शोक व्यक्त केला. या दोघांनीही मोदींना त्यांचा परदेश दौरा अर्धवट सोडून परत न येण्याची विनंती केली आहे.

१.२८ PM -जेटली यांच्या निधनामुळे खूप दुःख होत आहे. त्यांनी आजारपणाशी धैर्याने झुंज दिली. ते हुशार वकील, अनुभवी संसद सदस्य, प्रतिष्ठित मंत्री होते. त्यांना देशासाठी मोठे योगदान दिले. - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

१.२६ PM -राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि बड्या राजकीय नेत्यांनी जेटलींना वाहिली आदरांजली.

१.२४ PM -भाजप आणि जेटली यांच्यादरम्यान अतूट बंध आहेत. ते आणीबाणीदरम्यान लोकशाही वाचविण्यासाठी पुढे आले. ते आमच्या पक्षाचा चेहरा बनले होते. - नरेंद्र मोदी

१.२० PM - जेटली यांच्या निधनामुळे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू आंध्र प्रदेशातील नेल्लोर दौरा रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.

०१.०० PM -अरुण जेटली यांच्या जाण्याने मला खूप दुःख होत आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक दुःखाचाही प्रसंग आहे. जेटलीजी माझ्यासाठी केवळ सहकारी राजकारणीच नव्हते तर, माझ्या कुटुंबीयासारखेच होते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

१२.४० PM -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हैदराबाद दौरा अर्ध्यावर सोडून दिल्लीला रवाना.

१२.३२ PM -माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दर्शविला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तशी चिठ्ठीच लिहिली होती. गेल्या १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. त्यामुळे मला मंत्री बनविण्याचा विचार करू नका, असे जेटली यांनी या पत्रात नमूद केले होते.

Last Updated : Aug 25, 2019, 8:45 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details