नवी दिल्ली - माजी राज्यसभा खासदार शाहिद सिद्दीकी यांच्या पुतणीचा उपचार करण्यास दिरंगाई झाल्याने मृत्यू झाला आहे. तिला श्वास घेण्यास अडचण होत असल्याने, तसेच ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी सिद्दीकी यांनी ट्विट करत दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पुतणीची तब्येत गंभीर असूनही रुग्णालयाने वेळेत तिला अतिदक्षात विभागात दाखल केले नाही, तसेच तिला व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून दिली नाही; त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे. तसेच, रुग्णालयाची स्थिती अगदीच दयनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उपचारास दिरंगाईमुळे माजी खासदाराच्या पुतणीचा मृत्यू; दिल्लीमधील प्रकार.. यासोबतच, दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते म्हणतात, की रुग्णालयातील कर्मचारी लोकांना वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. मला दिल्लीच्या लोकांची कीव येते आहे. ही वेळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. दिल्लीमध्ये केंद्र आणि स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.
सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दिल्लीतील कित्येक रुग्णालयांनी तिला दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर सिद्दीकी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विट करत मदत मागितली होती. त्यानंतर सफदरजंग रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा :कोरोना संसर्गामुळे सीआरपीएफ जवानाचा मृत्यू, निमलष्करी दलात एकूण 11 जण दगावले