नवी दिल्ली -देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीटरवरुन त्यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवडाभरात जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे. तसेच त्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही मुखर्जी यांनी केले आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण - प्रणव मुखर्जी न्यूज
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीटरवरुन त्यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवडाभरात जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे, तसेच त्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही मुखर्जी यांनी केले आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण
दिवसेंदिवस देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रसासन काम करत आहे. अशातच आता राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात आडकत असल्याचे दिसत आहे.
प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांनी त्यांची प्रकृती लवकर स्थिर व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माजी मंत्री मिलिंद देवरा यांनीही तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत या सदिच्छा, असे ट्वीट केले आहे.
Last Updated : Aug 10, 2020, 2:06 PM IST