नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रक्रती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुखर्जी हे व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रक्रती स्थिर असल्याची माहिती लष्करी संशोधन आणि रेफरल रुग्णालयातील सुत्रांनी दिली आहे. माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, प्रकृती स्थिर - प्रणव मुखर्जी अपडेट न्यूज
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी तपासणी केली असता, त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्याबाबत पसरणाऱ्या अफवाही फेटाळून लावल्या आहेत.