नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुखर्जींना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.