महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अणुबॉम्बचा वापर भारत पहिल्यांदा करणार नाही - मनमोहन सिंग - नवी दिल्ली

भारत अणवस्त्र कराराचा अवलंब करणारा देश आहे. भारताकडून कधीही अगोदर अणुशस्त्रांचा वापर केला जाणार नाही. भारत अणुशस्त्रांच्या बाबतीत 'अनिच्छुक' देशांच्या पंक्तीत आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.

दिल्ली1

By

Published : Feb 25, 2019, 9:13 AM IST

नवी दिल्ली - भारत अणुकराराचे नियम पाळणारा देश आहे. त्यामुळे भारताकडून कधीही अगोदर अणुशस्त्रांचा वापर केला जाणार नाही.भारत अणुशस्त्रांच्या बाबतीत 'अनिच्छुक' देशांच्या पंक्तीत आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले. राकेश सूद लिखित ‘न्यूक्लियर ऑर्डर इन दि ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी' या पुस्तकाचे अनावरण दिल्लीत करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमात मनमोहन सिंग बोलत होते.

अणवस्त्रे वापरण्याच्या पूर्वीच्या करारांना इतिहासजमा करण्यासाठी काहींच्याकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे जागतिक तणाव वाढत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक देश अणवस्त्र संपन्न राष्ट्रे बनली आहेत आणि त्यांचा वापर करणे सोपे होऊन बसले आहे. यामुळे जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले.

मात्र, भारत अणवस्त्र कराराचा अवलंब करणारा देश आहे. भारताकडून कधीही अगोदर अणुशस्त्रांचा वापर केला जाणार नाही. जगातील अनेक लोकांना भीती आहे की, पूर्वीच्या अणुकरारांचे पालन होते की नाही. अतिसंवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास काही राष्ट्रांना धीर धरवणार नाही आणि ते अणुशस्त्रांचा वापर करण्यास सुरुवात करतील. यामुळे १९४५ न पाहिलेली स्थिती उद्भवण्याचा धोका जगाला आहे, अशी भीती मनमोहन सिंग यांनी बोलताना व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details