इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरोच्या १२ जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. २२० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अटक,आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना टो प्लाझा येथून गुरवारी अटक करण्यात आली आहे.
शाहिद खाकान अब्बासी
पाकिस्तानमधील मुस्लिम लीग- नवाज या राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते अब्बासी हे नवाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. लाहोरमधील एका आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते जात होते. यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. यापुर्वी पाकिस्तानच्या एनएबीने माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनाही आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती.