मुंबई - भारताचे माजी नौदल प्रमुख अॅडमिरल सुशिल कुमार यांचे आज (बुधवारी) दिर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीतील 'आर्मी रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटल'मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ७९ वर्ष होते.
हेही वाचा -देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नौदलाला समर्पित
सुशिल कुमार १९९८ ते २००० या काळामध्ये नौदल प्रमुख होते. ते मुळचे तमिळनाडूमधील नागरकोलाई येथील होते. त्यांनी भारतीय नौदलाचे १६ वे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय संरक्षण विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते.
सुशिल कुमार यांनी गोवा मुक्ती संग्रामच्या लढाईमध्ये भाग घेतला होता. तसेच १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात त्यांनी नौदलाचे 'ऑपरेशन हेड' म्हणून काम पाहिले होते. ऑपरेशन पवन आणि ऑपरेशन कॅक्टसमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना उत्तम युद्ध सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हेही वाचा -'पीएसएलव्ही - सी ४७' यानाचे यशस्वी प्रक्षेपण; 'कॅर्टोसॅट-३'सह सर्व १४ उपग्रह त्याच्या कक्षेत दाखल!