शिमला - नागालँडचे माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिमल्यातील घरी त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. अश्वनी कुमार हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालकही होते.
नागालँडचे माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांची गळफास घेऊन आत्महत्या - सीबीआय माजी संचालक अश्विनी कुमार
नागालँडचे माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. शिमल्यातील घरी त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
अश्विन कुमार
अश्वनी कुमार हे माजी आयपीएस अधिकारी होते. त्यांनी २००८ ते २०१० या काळात सीबीआयचे संचालक म्हणून काम पाहिले होते. ते मूळचे हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.