महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची कारकिर्द - भाजपच्या झंजावाती नेत्या सुषमा स्वराज

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. भाजपच्या झंजावाती नेत्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

By

Published : Aug 7, 2019, 9:18 AM IST

नवी दिल्ली- भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास व्हायला लागला होता. यानंतर त्यांना तत्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला स्वराज यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या अनेक केंद्रीय मंत्री, नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहेत.

सुषमा स्वराज

अशी आहे कारकिर्द -

सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ साली हरियाणातील अंबाला कन्टोन्मेंट येथे झाला होता.

सुषमा स्वराज बालपण

त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते.

स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून त्यांनी संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली.

त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला.

सुषमा स्वराज

१९७३ मध्ये, स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

सध्या त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या तसेच २६ मे २०१४ पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होत्या.

त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.

१९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.

सुषमा स्वराज

त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

१९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर, २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.

सुषमा स्वराज

२००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली.

डिसेंबर २००९ ते मे २०१४ दरम्यान त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.

सुषमा स्वराज

२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून त्या निवडून आल्या.

२६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या.

सुषमा स्वराज

ABOUT THE AUTHOR

...view details