नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चिदंबरम यांना आपला 74 वा वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे.
देशाच्या माजी अर्थमंत्र्यांना यंदा तुरुंगातच करावा लागणार वाढदिवस साजरा - आयएनएक्स मीडिया प्रकरण
माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना आपला 74 वा वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे.
पी. चिदंबरम
हे ही वाचा -आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तिहार तुरुंगात रवानगी
चिदंबरम यांना तुरुंगामध्ये अनेक सुविधा मिळणार आहेत. त्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट, झोपण्यासाठी लाकडाचा बाकडा, टीव्ही, पुस्तके, चश्मा आणि औषधेही पुरवली जाणार आहेत. याचबरोबर चिदंबरम यांना जेवणामध्ये दाळ, पोळी आणि भाजी खायला मिळणार आहे. तसेच त्याच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.