अहमदाबाद- काँग्रेसचे माजी खासदार अल्पेश ठाकोर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजराज भाजप अध्यक्ष जीतू वाघानी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. अल्पेश यांच्या व्यतिरिक्त धवल सिंह जाला यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का..! अल्पेश ठाकोर यांचा भाजपमध्ये प्रवेश - भाजप
अल्पेश यांच्या व्यतिरिक्त धवल सिंह जाला यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून मोठी निराशा झाल्याने राजीनामा देत असल्याचे अल्पेश ठाकोर यांनी स्पष्ट केले होते.
गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर यांची ओबीसी नेता म्हणून ओळख आहे. ठाकोर यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसमधील उमेदवारांविरोधात मतदान केल्यानंतर राजीनामा दिला होता. यानंतर, प्रतिक्रिया देताना ठाकोर म्हणाले होते, देशाला नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या इमानदार राष्ट्रीय नेतृत्वाला मी माझे मत दिले आहे.
अल्पेश ठाकोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ठाकोर म्हणाले होते, पक्षातील युवा नेतृत्वाकडे पाहुन मी पक्षात प्रवेश केला होता. परंतु, माझी मोठी निराशा झाल्याने मी राजीनामा देत आहे. काँग्रेसमध्ये मला मानसिक तणावाशिवाय दुसरे काही मिळाले नाही. मी आता या त्रासातून मुक्त झालो आहे.