देहरादून -उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरिश रावत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि बीएसपी प्रमुख मायावती यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देण्याची मागणी केली आहे. रावत यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक तसेच सार्वजनिक सेवेत भरीव काम केले आहे.
हरिश रावत यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात की, सोनिया गांधी आणि मायावती या राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाल किंवा नाही. पण महिला, सामाजिक तसेच सार्वजनिक सेवेमध्ये सोनिया यांचे काम भरीव आहे. याला तुम्ही नकारू शकत नाही.