भोपाळ -मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राम मंदिराच्या पायाभरणी समारंभावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. परंतु, यावेळी त्यांनी ट्विट करताना मोठी चूक केली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला आहे. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच माफी मागितली आहे.
दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त ट्विट, म्हणाले देशाचे 'पंतप्रधान' अमित शाह - राम मंदिर भूमिपूजन
दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 5 ऑगस्टला राम मंदिरच्या पायाभरणी समारंभाचा अशुभ मुहुर्त आहे. याची सविस्तर चर्चा जगदगुरू स्वामी स्वरुपानंद महाराज यांच्यासोबत झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोईनुसार हा अशुभ मुहूर्त काढला आहे.
दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 5 ऑगस्टला राम मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा अशुभ मुहुर्त आहे. याची सविस्तर चर्चा जगदगुरू स्वामी स्वरुपानंद महाराज यांच्यासोबत झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोईनुसार हा अशुभ मुहूर्त काढला आहे.
'भारताचे 'पंतप्रधान' अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह आहेत. राम मंदिराचे सर्व पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमला रानी वरुण यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेश अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना देखील कोरोना झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे', असे दिग्जविजय सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.