महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झारखंडच्या माता छिन्नमस्तिका मंदिर, बोरिया बाबा आश्रमाला भेट - Mata Chhinnamastika Temple

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते तसेच, भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस रामगढच्या रजरप्पा येथील माता छिन्नमस्तिका मंदिर परिसरातील प्रसिद्ध बोरिया बाबा यांच्या आश्रमात गेले होते. याची सध्या चर्चा आहे. येत्या महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. फडणवीस मातेचा आशीर्वाद घेऊन बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवू शकतात.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूज
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूज

By

Published : Sep 29, 2020, 8:38 PM IST

रामगढ (झारखंड) -महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते तसेच, भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस रामगढच्या रजरप्पा येथील माता छिन्नमस्तिका मंदिर परिसरातील प्रसिद्ध बोरिया बाबा यांच्या आश्रमात गेले होते. आश्रमात पूजन करून त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्याची प्रार्थना केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झारखंडच्या माता छिन्नमस्तिका मंदिर, बोरिया बाबा आश्रमाला भेट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता छिन्नमस्तिका मंदिर परिसरातील बोरिया बाबा यांच्या आश्रमात काही तास व्यतीत केले. याची सध्या चर्चा आहे. येत्या महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. फडणवीस मातेचा आशीर्वाद घेऊन बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवू शकतात. फडणवीस आश्रमात पोहोचल्यानंतर काही काळासाठी आश्रम बंद ठेवण्यात आला होता.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झारखंडच्या माता छिन्नमस्तिका मंदिर, बोरिया बाबा आश्रमाला भेट
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झारखंडच्या माता छिन्नमस्तिका मंदिर, बोरिया बाबा आश्रमाला भेट

हेही वाचा -चीनमधील 'कॅट क्यू' विषाणू आला भारतात; आयसीएमआरचा इशारा


देवेंद्र फडणवीस येथे छिन्नमस्तिका मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आल्याचे त्यांच्यासोबत आलेल्या बिंदु भूषण दुबे यांनी सांगितले. सध्या लॉक डाऊनमुळे मातेचे मंदिर बंद आहे. मात्र, फडणवीस यांनी मंदिराच्या परिसराबाहेर भैरवी नदीकाठी मातेची पूजा केली. यानंतर त्यांनी दामोदर-भैरवी संगमही पाहिला. दरम्यान, येथे बिहार किंवा महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी फडणवीस यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. आश्रमात फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य काही नेते उपस्थित होते.

हेही वाचा -'कृषी कायद्याला विरोधासाठी विरोध करणे हा संधीसाधूपणा, विरोधकांकडून शेतकऱ्यांचा अपमान'

ABOUT THE AUTHOR

...view details