महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईव्हीएम मशीनशी छेडछाड करता येत नाही- माजी निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत - Chief

स्टाँगरुममध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन हाताळण्यात येते तेव्हा आयोगाने आखून दिलेले नियम पाळले जातात. त्यावेळी विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्यासमोरच ईव्हीएम मशीन बाहेर काढण्यात येते. त्यामुळे ईव्हीएम मशीनशी छेडछाड करता येत नाही, असे माजी निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी सांगितले.

माजी निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत

By

Published : May 22, 2019, 7:44 PM IST

नवी दिल्ली - ईव्हीएम मशीन हाताळण्यात संबंधीचे नियम कठोर आहेत. स्टाँगरुममध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन हाताळण्यात येते तेव्हा हे नियम पाळले जातात. त्यावेळी विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्यासमोरच ईव्हीएम मशीन बाहेर काढण्यात येते. त्यामुळे ईव्हीएम मशीनशी छेडछाड करता येत नाही, असे माजी निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी सांगितले.

जेंव्हा ईव्हीएम मशीन मतदानासाठी तयार असते, त्यावेळी त्याची चाचणी घेतली जाते. तेव्हाही विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांना मत द्यायला लावून ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करते का ? याची खातरजमा केली जाते. चाचणी दरम्यान दिलेली मते त्याच उमेदवारांना मिळाली का हेही पाहिले जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदानास सुरुवात केली जाते. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करता येत नसल्याचे ओ.पी. रावत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details