नवी दिल्ली - बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे आज वयाच्या 82 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीमधील रुग्णालयात उपाचार घेत होते. जगन्नाथ मिश्रा यांच्या निधनानंतर बिहारमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन - राजकीय दुखवटा
बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे आज वयाच्या 82 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झाले आहे.
जगन्नाथ मिश्रा
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
कार्यकाळ -
- बिहारमधील दिग्गज नेते म्हणून ओळख असलेल्या मिश्रा यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
- विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते. तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
- जगन्नाथ मिश्रा यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला होता. त्यांचे मोठे बंधू ललीत नारायण मीश्रा हे रेल्वे मंत्री होते.
- जगन्नाथ मिश्रा 1975 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते 1980 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले.
- दरम्यान 1989 ते 1990 या काळात त्यांनी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला.
- 1990 च्या काळात ते केंद्रीय मंत्री देखील होते.
- त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले.