महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कौतुकास्पद: महिला वनअधिकाऱ्याने गरजूंसाठी घरच्या घरी बनवले 'मास्क' - masks for the needy at home

हिमाचल प्रदेशमध्ये शिमला विभागात वनरक्षक म्हणून तैनात असलेल्या हिंद प्रिया या गेल्या 4-5 दिवसांपासून गरजू आणि गरीबांसाठी मास्क बनवत आहेत. त्यांनी आतापर्यंत 450 मास्क बनवले आहेत. हे मास्क त्यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून गरिबांना वाटायचे आहेत.

Forest guard making masks, Himachal Desk
हिमाचल प्रदेशच्या महिला वनअधिकाऱ्याने गरजूंसाठी घरच्या घरी बनवले मास्क

By

Published : Apr 5, 2020, 11:44 AM IST

शिमला -देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासन त्यांच्या पातळीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहे. त्यात नागरिक देखील आपल्या परीने योगदान देत आहेत. अशातच हिमाचल प्रदेशमध्ये शिमला विभागात वनरक्षक म्हणून तैनात असलेल्या हिंद प्रिया या गेल्या 4-5 दिवसांपासून गरजू आणि गरीबांसाठी मास्क बनवत आहेत. त्यांनी आतापर्यंत 450 मास्क बनवले आहेत.

हिमाचल प्रदेशच्या महिला वनअधिकाऱ्याने गरजूंसाठी घरच्या घरी बनवले मास्क

हेही वाचा...दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४४५; आणखी रुग्ण वाढण्याची भीती..

हिंद प्रिया यांनी सांगितले की, हे मास्क त्यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून गरिबांना वाटायचे आहेत. ज्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकेल. बाजारात मास्कचा काही प्रमाणात तुटवडा आहे. तसेच गरिबांना मास्क सहजरित्या उपलब्ध होत नाही. यासाठी हे मास्क आपण गरिबांमध्ये वाटू इच्छित असल्याचे हिंद प्रिया यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details