महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर बनले भाजपचे अधिकृत सदस्य - जे पी नड्डा

जयशंकर यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.

एस जयशंकर यांचा भाजप प्रवेश

By

Published : Jun 24, 2019, 4:16 PM IST

नवी दिल्ली- भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भाजपचे अधिकृत सदस्य झाले आहेत. जयशंकर यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.

एस जयशंकर यांनी ३० मे रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे, आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत जयशंकर यांना राज्यसभेवर निवडुन येणे गरजेचे आहे. सुत्रांनुसार, भाजप गुजरातमधून एस जयशंकर यांना राज्यसभेवर घेण्याच्या तयारीत आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जयशंकर यांना ६ महिन्याच्या आतमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचे सदस्यत्व मिळवणे गरजेचे आहे.

एस. जयशंकर १९७७ सालच्या आयएफएस तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. २०१५ ते २०१८ पर्यंत त्यांनी मोदी सरकारमध्ये परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले होते. त्याआधी जयशंकर यांनी २००९ ते २०१३ पर्यंत बीजिंग येथे भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैन्यात झालेला वाद सोडवण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. चीनमध्ये एस. जयशंकर यांनी भारतीय राजदूत म्हणून काम पाहताना दोन्ही देशांत संबंध सुधारण्यासाठी चांगली कामगिरी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details