महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये चकमक, चार दहशतवाद्यांचा खात्मा.. - कुलगाम चकमक

मांझगाम तालुक्यातील हरमंद गुरी गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यां विरोधात कारवाई केली.

Forces kill two terrorists in Kulgam encounter
जम्मू काश्मीरमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा..

By

Published : Apr 4, 2020, 10:06 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सकाळीपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

मांझगाम तालुक्यातील हरमंद गुरी गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या गावावर सकाळी कारवाई केली. यावेळी दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक झाली. त्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तीन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात या तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे तेच दहशतवादी होते. ज्यांनी या तीन नागरिकांची हत्या केली होती. या गावामध्ये अजूनही काही दहशतवादी लपले असून, लष्करावर त्यांचा गोळीबार सुरूच आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :'या' तारखेपर्यंत एअर इंडियाची सर्व बुकिंग सेवा बंद

ABOUT THE AUTHOR

...view details