महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात 'या' ठिकाणी आहे प्रेषित मोहम्मद यांच्या पावलाने विरघळलेला दगड

मुस्लिम धर्मियांचे प्रेषित असणाऱ्या हजरत मोहम्मद सल्ललाह अलैह व सल्लम यांच्या पावलाने विरघळलेला दगड बारा (ता. अकबरपूर, जि. कानपूर देहात, उत्तर प्रदेश) या ठिकाणी आहे

या ठिकाणी आहे प्रेषित मोहम्मद यांच्या पावलाने विरघळलेला दगड

By

Published : Jul 14, 2019, 7:24 PM IST

लखनऊ- मुस्लिम धर्मियांचे प्रेषित असणाऱ्या हजरत मोहम्मद सल्ललाह अलैह व सल्लम यांच्या पावलाने विरघळलेला दगड बारा (ता. अकबरपूर, जि. कानपूर देहात, उत्तर प्रदेश) या ठिकाणी आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी त्याची दर्गाह बांधली असून या ठिकाणाला गावकरी श्रद्धास्थान मानतात.

भारतात 'या' ठिकाणी आहे प्रेषित मोहम्मद यांच्या पावलाने विरघळलेला दगड

येथील गावकऱ्यांच्या मते, प्रेषित मोहम्मद हे जेव्हा कोणा दगडावर पाय ठेवत तेव्हा तो दगड मेणाप्रमाणे वितळत असे. तर ज्यावेळी ते वाळवरून चालत असत त्यावेळी त्यांच्या पाउलखूणाही त्याठिकाणी उमटत नसे. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, २००१ साली एक गॅसच्या टँकरने स्फोट घेतला होता. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांना असे दिसले की, दोन वृद्ध घोड्यावरून येवून तो टँकर हवेत उडवला. यामुळे स्फोटात टँकरचा चक्काचूर झाला. त्याचे अवशेष गावात सर्वत्र पसरले. परंतु कोणतिही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकाच्या मते या स्फोटानंतर सुमार ५ कि.मी.च्या परिसरात मोठी जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता होती. पण, तसे काहीच झाले नाही.

यामुळे गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, या ठिकाणी प्रेषित मोहम्मद यांचे पाउल पडले होते. यामुळे या गावात कोणतीही आपत्ती येऊ शकत नाही. येथील सर्वधर्मीय लोकांना मोठी श्रद्धा आहे. या ठिकाणी प्रेषितांच्या या पाउलखुणा जपून ठेवल्या असून त्यासाठी दर्गाह केली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details