नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुढे १८ दिवसांनी वाढवला आहे. त्यामुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. त्यानिमित्ताने अनेकजण स्वयंपाकाचे वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. काहीजण आपल्या पुर्वजांप्रमाणे चुलीवर मातीच्या भांड्यात जेवण बनवत आहेत.
मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण स्वादिष्ट, लॉकडाऊन काळात अनेक जणांचा प्रयोग - Food cooked on earthen pots
जुन्या काळात स्टील, जर्मन यांसारख्या धातूंची भांडी उपलब्ध नव्हती. तसेच अत्याधुनिक सोयीसुविधा सुद्धा नव्हत्या. त्यामुळे आपले पुर्वज चुलीवर मातीच्याचं भांड्यात स्वयंपाक बनवत होते. यामुळे आपले पुर्वज निरोगी होते. तसेच त्यांचे आयुष्यमान देखील जास्त होते. त्याचप्रमाणे आता लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकजण मातीच्या भांड्यात स्वयंपाक बनवत आहेत.
जुन्या काळात स्टील, जर्मन यांसारख्या धातूंची भांडी उपलब्ध नव्हती. तसेच अत्याधुनिक सोयीसुविधा सुद्धा नव्हत्या. त्यामुळे आपले पुर्वज चुलीवर मातीच्याचं भांड्यात स्वयंपाक बनवत होते. यामुळे आपले पुर्वज निरोगी होते. तसेच त्यांचे आयुष्य देखील जास्त होते. त्याचप्रमाणे आता लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकजण मातीच्या भांड्यात स्वयंपाक बनवत आहेत. तसेच या भांड्यातील जेवण अतिशय स्वादिष्ट्य असल्याचा दावा देखील ते करतात.
आता धातूंच्या भांड्यात स्वयंपाक केल्यानंतर जेवणामधील जीवनसत्व कमी होतात. इतकेच नाहीतर त्याचा स्वाद देखील कमी होतो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात काहीजण मातीच्या भांड्यात स्वयंपाक बनवण्याचा प्रयोग करत आहेत.