नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टला श्वसनाचा त्रास होत असल्याने जेटलींना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटलींचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
विद्यार्थी परिषदेचे सदस्य ते केंद्रीय अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवास.. - navi delhi
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
राजकीय प्रवास
१) अरुण जेटली हे विद्यार्थी दशेपासूनच भाजपशी जोडले गेले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सदस्य होते.
२) 1974 साली ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले.
३) 1991 साली ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले.
४) 1999 साली केंद्रात सत्तेत आलेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये अरुण जेटलींनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.
५) 2000 साली ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्यावर कायदा व न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.
६) 2004 साली एनडीएच्या पराभवानंतर जेटली भाजपचे सरचिटणीस बनले. पक्षाने त्यांना राज्यसभेवरही पाठवलं.
७) 2009 मध्ये भाजपनं राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून जेटलींची निवड केली.
८) 2014 मध्ये अरुण जेटलींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जेटलींचा पराभव केला.
९) २०१४ च्या पराभवानंतर जेटलींना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं. तयानंतर नमोदी सरकारमध्ये त्यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्रीपदीची जबाबदारी सोपवण्यात आली.