नवी दिल्ली -देशात कोरोनाने थैमान घातले आहे. आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेची गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी 23.9 टक्क्यांची घसरगुंडी झाली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 73 वर्षांत पहिल्यांदा अर्थव्यवस्था आणि सामान्य व्यक्तीचं कंबरड मोडलं आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन हे मास्टर स्ट्रोक नाही. तर डिजास्टर स्ट्रोक आहेत. तसेच अर्थव्यवस्थेच्या दुर्देशेला देवाला दोष देणारे भाजप पहिलेच सरकार आहे, अशी टीका आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
आज देशात लघु, सूक्ष्म आणि मध्यम व्यवस्याय बंद पडले असून रोजगारचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून जीडीपीने पाताळ गाठले आहे. गेल्या 6 वर्षांपासून 'अॅक्ट ऑफ फ्रॉड'ने अर्थव्यवस्थेला डबघाईला नेणारे मोदी सरकार आता याचे खापर 'अॅक्ट ऑफ गॉड' वर म्हणजेच देवावर फोडत आहे. जी लोक देवालाही धोका देत आहेत. ती लोक समान्य व्यक्ती आणि अर्थव्यवस्थेला कसे सोडतील, असे सुरजेवाला यांनी म्हटलं.