नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना तीन ते चार तास फ्लाईटच्या वेळेच्या अगोदर जावे लागणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिनाच्या तयारीसाठी व इतर काही कारणांमुळे ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली विमानतळावर कडक सुरक्षा; प्रवाशांना विमानतळावर तीन तास अगोदर पोहोचावे लागणार - Delhi Airport
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
दिल्ली विमानतळावर कडक सुरक्षा
दिल्ली विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर तीन ते चार तास अगोदर पोहोचावे लागणार आहे. याचबरोबर विमानतळावर प्रवाशांना भेटण्याची आणि स्वागत करण्यासाठी जे क्षेत्र तयार आहेत. त्या क्षेत्रातील प्रवेश 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान खंडित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षा सतर्कतेमुळे ही सर्व पावले उचलली गेली आहेत.