लंडन - अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लाईडची पोलिसांनी हत्या केल्यानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच मोठ्या शहरात आंदोलन, निर्दशने आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या प्रकरणावर इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 45 वर्षीय फ्लाईडची हत्या हा अक्षम्य गुन्हा आहे, त्यामुळे नागरिक का आंदोलन करत आहेत, हे मी समजू शकतो, असे जॉन्सन म्हणाले.
जॉर्ज फ्लॉईडची हत्या हा 'अक्षम्य' गुन्हा; आंदोलकांचा राग समजू शकतो - George Floyd news
जॉन्सन यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेत जे काही घडले ते ठळकपणे उठून दिसणारे होतं. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. आपण सर्वांनी काय घडलं ते टिव्हीवर पाहिलं, त्यामुळे नागरिकांना या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क आहे, हे समजू शकतो.
जॉन्सन यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेत जे काही घडले ते ठळकपणे उठून दिसणारं होते. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. आपण सर्वांनी काय घडलं ते टिव्हीवर पाहिलं, त्यामुळे नागरिकांना या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क आहे, हे समजू शकतो. मात्र. आंदोलन कायदेशीर आणि संयमीपणे व्हायला पाहिजे, असे जॉन्सन म्हणाले.
युरोपीयन युनियनमधून बाहेर पडल्यापासून डोनाल्ड ट्रम्प आणि बोरिस जॉन्सन यांच्यात सौदार्ह्याचे संबध आहेत. मात्र, इंग्लडमधली विरोधी पक्षांकडून अमेरिकेला होणार टिअर गॅस आणि रबरी बुलेटची निर्यात थांबवावी, अशी मागणी होत आहे. इंग्लडची सर्व शस्त्र निर्यात देशाच्या मानवी हक्कांना धरून आहे. त्यात युनायटेड किंग्डम आणखी कठीण निरिक्षणाचे धोरण अवलंबते, असे जॉन्सन म्हणाले.