गुवाहटी (आसाम)-राज्यातील पूर परिस्थितीमुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे रस्ते, पूल आणि इतर इमारतींचे नुकसान झाले आहे, असे सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. आतापर्यंत एकूण 33 लोकांचा मृत्यू झालाय तर 24 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
बारपेटा जिल्ह्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. दुबरी नागाव नलबारी या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती मुळे झालेल्या घटनांमध्ये हे तिघांचा मृत्यू झाला. काचार जिल्ह्यात दरड कोसळून पन्नास वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. गुवाहटी निमती घाट जोरात तेझपूर सोनितपूर गोलपारा डुबरी येथून ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
मंगळवार पर्यंत राज्यातील 33 जिल्ह्यात पैकी 23 जिल्ह्यांमधील 14.94 लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. बुधवारी ही संख्या वाढून 14. 95 लाख वर गेली.
पुराचे पाणी माजुली, पश्चिम कर्बी अंगलॉंग या जिल्ह्यातून ओसरले आहे. मात्र, ढेमजी, लखमीपूर, बिस्वनाथ, चिरांग, दरंग, नलबारी, बारपेटा, बोंगागांव, धुबरी, दक्षिण साल्मारा, गोलपारा, कामरूप, मोरीगाव, होजाई, नागाव, गोलाघाट, जोरहाट, शिवसागर, दिब्रूगड आणि तीनसुकिया हे जिल्हे अजूनही पाण्याखाली गेले आहेत.