गांधीनगर- गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान (एनडीआरएफ) पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. पुरामुळे महाराष्ट्र-गुजरात मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
वडोदऱ्यात पूर परिस्थिती, महाराष्ट्र - गुजरात मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द - वडोदऱ्यात पूर
गुजरातचे मुख्यंमत्री विजय रुपानी यांनी पूर परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी काल (गुरुवारी) उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. पूरामुळे महाराष्ट्र गुजरात मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गुजरातचे मुख्यंमत्री विजय रुपानी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल (गुरुवारी) उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे वडोदरा स्थानकात रुळावर पाणी साचल्याने पोरबंदर, अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या आणि मुंबई येथून वडोदरा, भुजला जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.