गुवाहटी (आसाम) : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण 27 जिल्ह्यात या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील 86 महसूल क्षेत्रातील 2 हजार 763 गावांतील 22 लाख लोकांना याचा फटका बसला आहे.
आसाममध्ये पूराचा कहर; 27 जिल्ह्यातील 22 लाख लोकांना फटका - आसाम पूर परिस्थिती लेटेस्ट बातमी
आतापर्यंत या पूरामुळे 50 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. नागरिकांचे जनजीवन पुर्णप्णे विस्कळित झाले आहे. नागरिकांच्या संकटात पुरपरिस्थितीमुळे आणखीनच भर पडली आहे. पूरग्रस्त भागातील ब्रह्मपुत्रा, बुरहिडीहिंग, धनसीरी, जिया भरली, कोपीली, पुथिमारी, पगलाडिया, मानस, कुशियारा या नद्यांना धोक्याची पातळी ओलांडली आहे.
आतापर्यंत या पूरामुळे 50 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. नागरिकांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळित झाले आहे. नागरिकांच्या संकटात पुरपरिस्थितीमुळे आणखीनच भर पडली आहे. पूरग्रस्त भागातील ब्रह्मपुत्रा, बुरहिडीहिंग, धनसीरी, जिया भरली, कोपीली, पुथिमारी, पगलाडिया, मानस, कुशियारा या नद्यांना धोक्याची पातळी ओलांडली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात होणाऱ्या पावसामुळे तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांआधी संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दिब्रुगड जिल्ह्यातील २५ हजार लोकांना फटका बसला. यामुळे दिब्रुगड जिल्ह्यात १४ निवारा केंद्रही स्थापन करण्यात आली होती. यावेळी पुराचे पाणी सेवानिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घरात घुसले होते. यानंतर त्यांच्या आजारी आईला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.