महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली भारतीय वायूसेना - वायुसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

भारतीय वायुसेना गुजरात आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. पूरभागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासोबत या नागरिकांना आहार पोहोचविण्याचे कार्य भारतीय वायुसेनेने युद्धपातळीवर सुरु ठेवले आहे.

भारतीय वायुसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

By

Published : Aug 12, 2019, 10:30 AM IST

अहमदाबाद- भारतीय वायुसेना गुजरात आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. पूरभागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासोबत या नागरिकांना आहार पोहोचविण्याचे कार्य भारतीय वायुसेनेने युद्धपातळीवर सुरु ठेवले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली भारतीय वायूसेना

गुजरात सरकारच्या विनंतीवर ४ ऑगस्ट रोजी वायुसेनेमार्फत ही मोहीम सुरु करण्यात आली. त्यानुसार गुजरातमधील नवसारी या पूरग्रस्त भागातून ४५ पुरुष, महिला आणि मुलांना २ हेलिकॅप्टरमधून सुरतमधील सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले.

भारतीय वायुसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापुरात ६ ऑगस्टपासून वायुसेनेने बचाव मोहीम अधिक वेगाने सुरू केले. राज्य प्रशासनाने पुण्यात तैनात केलेली मदत सामग्री या विमानांचा वापर करून कोल्हापुरात आणण्यात आली. पूरग्रस्त भागात मदत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी वैमानिकांनी त्यांच्या उत्कृष्ट उड्डाण आणि व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग केला.
महापुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तसेच याठिकाणी हवामानही अनुकूल नाही. अशा कठीण परिस्थितीही वायुसेना अविरतपणे आपले बचावकार्य सुरु ठेवले.

पूरग्रस्तांसाठी विमानातून आहाराचा पुरवठा

गुजरातमधील जामनगरजवळील जोडिया आणि पिट्टर येथेही सध्या वायुसेनेतर्फे बचाव मोहीम हाती घेण्यात आले. यामध्ये दोन एमआय १७ हेलिकॅप्टर्स २९ जणांचे बचावकार्यासाठी पाठवण्यात आले. सध्या वायुसेना या पूरग्रस्त भागात नजर ठेवून आहे. तसेच मुंबई, पुणे, बडोदा आणि जामनगर येथेही आपली सेना तैनात ठेवली आहे.

पूरग्रस्तांसाठी विमानातून आहार घेऊन जाताना वायुसेना

दरम्यान, आतापर्यंत वायुसेनेने महिला आणि मुलांसह १५६ लोकांची पुर भागातून सुटका केली. तर २३ टन मदत सामग्री विमानातून पाठविले. यासाठी १२४ एनडीआरएफ, एसडीआरएफ, भूदल आणि नौदल पथकाच्या १२४ कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details