पटना- नेपाळचा तराई भाग आणि उत्तर बिहारमध्ये बरसलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. पूरामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील १२ जिल्हे पुरामुळे प्रभावीत झाले असून यामध्ये २५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आत्तापर्यंत पुरामध्ये ७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
मोतीहारी जिल्ह्यात २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. सीतामढी येथे ५ लोकांचा मृत्यू झाला तर शिवहरमध्ये ६ मुलींचा मृत्यू झाला आहे. सुपौल येथेही ५ जणांचा मृत्यू झाला आहे.