महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : फ्लिपकार्टची स्पेंसर रिटेलमध्ये भागीदारी, आता किराण्यासह इतर वस्तूही मिळणार घरपोच - Flipkart joins Spencers Retail

फ्लिपकार्ट ग्रुप समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, घरी राहून कोरोनाच्या विरोधात लढायला हातभार लावणार्‍या ग्राहकांच्या सहकार्यासाठी आणि त्यांच्या गरजा भागविण्यासाठी स्पेंसर रिटेलसह हा पायलट प्रोजेक्ट सुरू केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.” आम्ही ग्राहकांना त्यांच्या भागात उपलब्ध असलेल्या वस्तू हव्या त्या वेळेत आणि झटपट उपलब्ध होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू वेळात आणि घरपोच मिळतील, असेही ते यावेळी म्हणाले.

फ्लिपकार्टची स्पेंसर रिटेलमध्ये भागीदारी
फ्लिपकार्टची स्पेंसर रिटेलमध्ये भागीदारी

By

Published : Apr 10, 2020, 2:44 PM IST

ई-टेलर कंपनी फ्लिपकार्टने किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या हायपरलोकल डिलीव्हरीसाठी स्पेन्सर या रिटेल चेन स्टोरबरोबर हातमिळवणी केली आहे. या उपक्रमाची सुरुवात ही हैदराबादपासून केली जाणार आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ग्राहकंना स्पेन्सर स्टोर्समधील जीवनावश्यक वस्तू, किराणा आदि फ्लिपकार्टच्या अ‌ॅपधून मागवता येणार आहेत. या वस्तून ग्राहकांना होम डिलीवरी म्हणजेच घरपोच पोहचवल्या जातील असेही ई-टेलरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत बोलताना फ्लिपकार्ट ग्रुप समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “घरी राहून कोरोनाच्या विरोधात लढायला हातभार लावणार्‍या ग्राहकांच्या सहकार्यासाठी आणि त्यांच्या गरजा भागविण्यासाठी स्पेंसर रिटेलसह हा पायलट प्रोजेक्ट सुरू केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.” आम्ही ग्राहकांना त्यांच्या भागात उपलब्ध असलेल्या वस्तू हव्या त्या वेळेत आणि झटपट उपलब्ध होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू वेळात आणि घरपोच मिळतील, असेही ते यावेळी म्हणाले.

"या कठीण वातावरणात फ्लिपकार्टबरोबर स्पेंसरची भागीदारी मोठ्या संख्येने ग्राहकांना आमच्या आवश्यक वस्तूंच्या रेंजमध्ये अखंडितपणे प्रवेश करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ शकते. या भागीदारीतून ग्राहकांना आवश्यक वस्तूंच्या घरपोच वाटपासह दोन्ही कंपन्यांमधील भागीदारी आणि सहकार्याचा फायदा आमच्या ग्राहकांना घरपोच घेता घेईल. असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन दरम्यान ग्राहक वस्तू, साहित्य खरेदी करण्यासाठी आमच्या स्वत:च्या स्पेंसर अ‍ॅपशिवाय इतर नामांकित प्लॅटफॉर्म / बाजारपेठ उपलब्ध असल्याचे, 'स्पेंसर रिटेलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र चावला यांनी ट्वीट करून स्पष्ट केले. देवेंद्र चावला यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सुहेल सेठ यांच्या स्पेंसरच्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्याच्या शब्दांबद्दल आभारही मानले आहेत.

२१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान मनुष्यबळ कमी झाल्याने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या मोठ्या ई-टेलर्सने कंपन्याच्या कामावर परिणाम झाला आहे. यासोबतच अन्य काही कंपन्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. या आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी आता कंपन्या एकमेकांचा आधार घेत आहेत. नुकतंच, नामांकित राईड हेलिंग कंपनी उबरने फ्लिपकार्टबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. या भागीदारी अंतर्गत ते बंगळुरु, मुंबई आणि दिल्लीतील लोकांना जीवनावश्यक वस्तूंना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी उबर राई्डची मदत घेणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details