महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट, दिल्ली विमानतळ राहणार 2 तास बंद - दिल्ली विमानतळ राहणार 2 तास बंद

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

By

Published : Jan 25, 2020, 10:51 PM IST

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 26 नोव्हेंबर रोजी आपण 71 वा 'संविधान दिन' साजरा करणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 2 तास बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर देशात हाय अलर्ट, दिल्ली विमानतळ राहणार 2 तास बंद


प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांच्या कुरापती सुरू आहेत. त्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत कोणत्याही विमानाचे लँडिंग आणि उड्डान होणार नाही. यासंबधी प्रशासनाकडून परिपत्रक जारी केले असून प्रवाशांना वेळेत पोहोचण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.


प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बीसीएएसकडून हाय अलर्ट दिला जातो. तसेच देशातील या प्रमुख शहरांमध्ये विमानतळावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या 7 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details